✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂
एका प्रतिष्ठित सॉफ्टवेअर कंपनी साठी सहाय्यक पद नेमणे आहे . संगणकाचे कार्य ज्ञान असणे गरजेचे , इंग्रजी भाषेतील संभाषण कौशल्य गरजेचे , आमच्याशी संपर्क साधा :
व्यवस्थापक सॉफ्टवेअर्स , पोस्ट बॉक्स नंबर १२६, मुंबई – ४०० ००१ ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂
उत्तर: ७५५, शारदासदन, ममतानगर, पुणे - ४११ ००५
दिनांक: ११ जून २०२१ प्रति, मा. व्यवस्थापक, ओम सॉफ्टवेअर, पोस्ट बॉक्स नं. १२५, मुंबई – ४०० ४०१ विषय: सहाय्यक पदासाठी अर्ज. संदर्भ: ११ जून २०२१ रोजी ‘दैनिक भारत’ या वर्तमानपत्रातील जाहिरात. आदरणीय महोदय, आज दिनांक ११ जून २०२१ च्या ‘दैनिक भारत’च्या छोट्या जाहिरातींच्या अंकात आपल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सहाय्यक पद भरावयाचे असल्याची जाहिरात वाचली. मी या पदावर काम करण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी अर्ज सादर करीत आहे. मी माझे बारावीचे शिक्षण विज्ञान शाखेतून 65% सह उत्तीर्ण झालो आहे आणि मला इंग्रजी भाषेतील संभाषण अगदी सहज जमते. माझ्याकडे संवाद साधण्याचे कौशल्य सुद्धा आहेत. मी तीन महिन्याचा एम.एस.सी.आय.टी. कॉम्प्युटर कोर्स पूर्ण केला आहे. मला एमएस वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, यांची कौशल्ये सुद्धा आत्मसात आहेत.
मी याआधी कोणत्याही ठिकाणी नोकरी केलेली नाही, पण टंकलेखनाचे खाजगी स्वरूपातील कामे सातत्याने करीत असल्याने माझ्याकडे असणाऱ्या कौशल्यांचा मला चांगला सराव आहे. मी आपल्या कंपनी सहाय्यक पदाचे काम हे समाधानकारकरित्या पार पाडू शकेन, असा मला विश्वास वाटतो. या पत्रासोबत माझ्या परीक्षांची प्रमाणपत्रे, माझे स्वपरिचय पत्र जोडत आहे. मी माझ्या बारावीच्या निकालाची छायाप्रत आणि तीन महिन्याच्या कम्प्युटर कोर्से कोर्स चे प्रमाणपत्र देखील सादर करत आहे. माझ्या अर्जाचा विचार करून मला मुलाखतीची संधी द्यावी ही नम्र विनंती.
आपला विश्वासू, -सही- (अ.ब.क.) सोबत:
1. इयत्ता बारावी उत्तीर्ण गुणपत्रक झेरॉक्स प्रत 2. कंप्यूटर कोर्स चे प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत 3. स्वपरिचय पत्र
उत्तर: ७५५, शारदासदन, कोकणनगर, रत्नागिरी - ४१५ ६१२
दिनांक: ११ जून २०२१
प्रति, मा. व्यवस्थापक, ओम इन्फोसीस, रत्नागिरी – ४१५ ६१२
विषयी: लिपिक पदासाठी अर्ज. संदर्भ: १० जून २०२१ च्या ‘दैनिक कोकण’ मधील जाहिरात. महोदय, दिनांक: १० जून २०२१ च्या ‘दैनिक कोकण’ मधील आपल्या जाहिरातीत अनुसरून मी आपल्या कंपनीतील रिक्त असणार्या लिपिक पदासाठी अर्ज सादर करीत आहे. जाहिरातीतील सूचनेनुसार मी सोबत शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील या पत्र सोबत जोडत आहे. मी अर्धवेळ नोकरी करून माझे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. नोकरीतील कामाची जबाबदारी, कष्ट आणि नोकरी चे महत्व सर्व गोष्टींचे मला भान आहे. त्यामुळे आपण आपल्या कंपनीत काम करण्याची संधी दिल्यास मी अत्यंत प्रामाणिकपणे व तत्परतेने कार्य करीन अशी खात्री देतो.
आपला विश्वासू -सही- (अ.ब.क.) सोबत:
1. एम.एस सीआयटी प्रमाणपत्र सत्यप्रत 2. एस.एस.सी प्रमाणपत्र सत्यप्रत 3. एच.एस.सी प्रमाणपत्र सत्यप्रत 4. बी.एस.सी प्रमाणपत्र सत्यप्रत 5. स्वपरिचय पत्र